Ad will apear here
Next
पुरुष स्त्रीमध्ये नेमके काय शोधत असतो?


‘What man really looks in woman?’ हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असावा. तसाच तो पुरुषांच्याही कायम डोक्यात असतोच! या प्रश्नाचे उत्तर ‘स्लीपलेस इन सिअॅटल’ या हॉलिवूड चित्रपटातून मिळते. या चित्रपटाबद्दल श्रीराम जोशी यांनी लिहिलेले हे चार शब्द...
...........
‘What man really looks in woman?’ हा प्रश्न बऱ्याच स्त्रियांना पडत असावा. तसाच तो पुरुषांच्याही कायम डोक्यात असतोच! बऱ्याच स्त्री-पुरुषांच्या मते स्त्रीचे सौंदर्य, वागण्या-बोलण्यातील एलिगन्स, डौलदार चालणे, तिचे लूक्स, पाणीदार डोळे, कमनीय बांधा, wittiness, व्यावसायिक यश, व्यावसायिक उच्च वर्तन, घरंदाजपणा अशी बरीच उत्तरे येतील; पण पुरुषांच्या मते ती विशेषणे स्त्रीच्या पूर्णत्वाला न्याय देत नाहीत. याहीपलीकडे खरा पुरुष स्त्रीमध्ये नेमकेपणाने काय बघत असतो, म्हणण्यापेक्षा नेमके काय शोधत असतो?

१९ नोव्हेंबर २०१९ रोजी मेग रायन या हॉलिवूड अभिनेत्रीचा वाढदिवस झाला. मला इंग्लिश रोमँटिक मूव्हीज बघायला आवडतात. कारण त्यातील हळुवार प्रेमभावना अगदी रेशमाच्या मऊ लडीप्रमाणे अलगद उलगडल्या जातात आणि आपल्यासमोर त्यातील तलम रेशमी आशयभाव नेमक्या प्रसंगातून अल्लद उलगडून दाखवून दिग्दर्शक आपल्याला खिळवून ठेवतात. चित्रपट कुठेही न लांबवता ‘अपने दिमाग की घंटी बजा के’ तुम्हाला त्या भावनांच्या आवर्तात भिरकावून देत त्यात चिंब भिजवून दिग्दर्शनाची कमाल मर्यादा अगदी छोट्या छोट्या प्रसंगांतून गाठतात. त्या भावनांच्या लाटांवर लाटा आपल्यावर आदळत अशी काही आंदोलने मनात निर्माण करतात, की बस्स, ‘यही होना चाहिये था!, ये दिल मांगे मोअर’ ही अवस्था करीत तुमची स्थिती १८ ते २३च्या वयोगटातील नवथर तरुणासारखी करतात! 



नुकताच मी ‘स्लीपलेस इन सिअॅटल’ हा मेग रायन आणि टॉम हँक्सचा जुना चित्रपट बघितला. तो ‘An affair to remember’च्या सेंट्रल थीमवर थोडा आधारित आहे. मी याआधीही बघितला होताच; पण आज तो मनाला हलवून गेला आणि त्यातील मेग म्हणजे सिनेमातील अॅनी खूप कमी दृश्यांत असूनही व फारसे तिला संवाद नसूनही तिच्या पडद्यावरील बोलक्या चेहऱ्यातून आणि संवेदनशील अभिनयातून अशी काही हृदयात घुसते, की ‘बस्स पूछो मत यारों!’ खरे तर तिला ऑस्करसाठी नामांकन मिळून ऑस्कर मिळाले नाही याचे परम दुःख मला परत एकदा झाले! 

...तर पुरुष नेमके काय शोधतो, तर त्याला सर्वार्थाने समजून घेणारी सखी! चित्रपटातील जोनाह म्हणजे सॅमच्या मुलाने आई वारल्यानंतर बापाची काळजी व प्रेमापोटी छान प्रेमळ नवीन आई मिळवण्यासाठी रेडिओ स्टेशनला मानसशास्त्रीय हेल्पलाइनवर केलेल्या निरागस कॉलवर टॉम हँक्स म्हणजे चित्रपटातील सॅम स्वतःच्या गमावलेल्या बायकोविषयीचे रेशमी बंध नकळत उलगडत बोलत असतो. त्या वेळी अॅनी कार ड्राइव्ह करीत तो इंटरव्ह्यू अचानक ऐकत असताना अभावितपणे तिचे हावभाव आणि त्याच्या प्रश्नांबरोबरच त्याने स्वतः दिलेल्या उत्तरांशी मिळताजुळता असणारा अॅनीचा स्वतःशीच होणारा एक्सप्रेसिव्ह संवाद हा फक्त चार-पाच मिनिटे चालणारा प्रसंग; पण एकदम लाजबाव! तो प्रसंगच, ‘अरे, तुला तुझ्या स्वप्नातील स्त्री पाहिजे होती ना, ती हीच! हीच!’ असे त्याच्यासाठी अभावितपणे आपल्या मनात उतरवतो. मग चित्रपट अशी काही पकड घेतो, की त्याचे गारूड तो संपल्यावरही आपल्या मनावरून उतरत नाही! 



इथे तिच्या डोळ्यांतून खरे तर कुठलीही ओळख नसताना त्याच्या सच्च्या भावनांना चटकन समजून ओघळणारे तिचे अश्रू, त्याच्या भावनांशी तिने साधलेली एकरूपता, वाटलेली काळजी, त्याच्याविषयी कुतुहलातून निर्माण झालेली, पण ओळख नसतानाही भेटण्याची अनिवार ओढ, त्याच्या आयुष्यात पुढे काय घडतेय याच्या प्रचंड उत्सुकतेने तिच्याही नकळत तिला त्याच्याकडे मायेपोटी, काळजीपोटी ढकलले जाण्याची प्रक्रिया! पण ही स्त्री केवळ भावविवश वगैरे नाही, ती अतिशय हुशार आणि सावध करिअरिस्ट जर्नालिस्ट आहे. सॅमची संपूर्ण माहिती तर ती इंटरनेटवरून मिळवतेच; पण त्याच्या भावना व वस्तुस्थिती खरी आहे ना याची खातरजमा अगदी डिटेक्टिव्ह त्याच्या मागे लावून गुपचूप जाणून घेते!

नंतरच्या प्रसंगात न ठरवता सॅमलाच भेटायला सीअॅटलला मुद्दाम आलेली ती विमानतळावर त्याला अचानक सामोरी येते, तेव्हा तिच्याकडे सॅमचे ‘देजा वू’ (पूर्वदृष्ट वा पूर्वस्मृती जागृत होऊन मनाची होणारी उलघाल) होऊन ओळख नसताना एकटक अनिमिष नेत्रांनी बघत राहणे! पण ते खिजगणतीतही नसलेली ती! तिच्याकडे बघत मुलाशी एकीकडे बोलत, समजावत जाणाऱ्या सॅमच्या संवादाचे दृश्य शॉटमध्ये दाखवले जात असतानाच वेगाने चालत त्याच्या नजरेतून निसटत दूर दूर होत जाणारी ती! हे दृश्य सर्वांच्या मनाला अनाकलनीय हुरहूर लावणारे. खरेच सारेच अफाट विलक्षण! हिंदी सिनेमात अशा प्रसंगी दाखविला जाणारा मेलोड्रामा या ब्रिलियंट दिग्दर्शकाने कमालीच्या संयमाने टाळला आहे. त्यामुळेच पुढील प्रसंगाचा तरल अभिजातपणा, खुमारी आणि तीव्रता अगदी छोटी, छोटी दृश्ये प्रसंग असतानादेखील आपल्यासाठी खूप वाढवतात! 

ते अनुभवताना, जाणवत असतानाच मनात वरील भावनांनी नेमके उमगते ते हेच, की What man really looks in woman? त्यानंतर सॅमच्या घराजवळ ती भेटायला आलेली असताना तिचे भर रस्त्यात अगदी मधोमध येण्याने अंगावर चालून येणाऱ्या ट्रक, कारच्या कर्णकर्कश हॉर्नच्या आवाजाने भांबावलेली ती व तो, त्या होणाऱ्या नजरभेटीत तिच्या व त्याच्या तोंडून एकमेकांकडे एकटक बघत फक्त ‘हॅलो’व्यतिरिक्त शब्दही न फुटता तिचे निघून जाणे आपल्यालाच प्रचंड हळहळायाला लावते! शेवटच्या प्रसंगात तर आता यांची भेट होणार तरी का, अशी आपल्याच काळजात कालवाकालव होत असताना जोनाह म्हणजे मुलाची विसरलेली बॅग तिला दिसणे, ती उघडून बघत असताना बाप-मुलगा बॅग घेण्यासाठी डेकवर परत येतात, तेव्हा तिला बघितल्यावर सॅम म्हणतो, ‘तू?’ त्यावर अवघडलेली उभी असणारी ती उत्तरते, ‘होय मीच!’ दोघांची भेट झाल्याने मनातून आनंदलेली, पण भावनांचा कल्लोळ दाबून संयमी प्रतिक्रिया देणारी! ती काहीच बोलत नाही! पण मुलगा विचारतो तेव्हा मात्र ‘हो मी अॅनी’ एवढेच सांगते ना, तेदेखील इतके जीवघेणे आहे ना, की आपला श्वास अडकून आपणदेखील कासावीस होतो. 

नंतर ऑब्झर्व्हेशन डेकची वेळ संपल्याची जाणीव एम्पायर स्टेट इमारतीचा लिफ्टमॅन खाकरून करून देत असताना ‘निघायला हवे नाही का आपण,’ असे सॅम विचारत अलगद हात पुढे करतो. त्याच्या डोळ्यात बघत हरवलेली ती नकळत अत्यंत हळुवारपणे त्याच्या हातात हात देते व त्याने हात हातात घेतल्यावर तिचा सलज्ज अवघडलेला होकार गृहीत धरत तिच्या पालथ्या हातावर आश्वासक विश्वास देणारी नाजूकपणे फिरणारी त्याची बोटे हा प्रसंग, म्हणजेच पुरुष नेमके काय बघतो याचे उत्तर आहे! या चित्रपटातील अॅनी प्रत्येक पुरुषाला अगदी हवीहवीशी वाटेल अशीच आहे! हा चित्रपट अतिशय तरल आहे आपल्या सगळ्यांच्या तरल भावना नेमकेपणाने व्यक्त करणारा व सगळ्यांनी शांत, निवांतपणे पाहत एन्जॉय करण्यासारखाच! 

- श्रीराम जोशी
मोबाइल : ९९२०५ ६२३४०
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/OZMFCH
Similar Posts
वाटांसवें त्या पळालों सारें काहीं झुगारून...! अन्न, वस्त्र, निवारा या मूळ गरजा भागवणारा मानव उत्क्रांत होत गेला तशा दया, करुणा अशा उन्नत समजल्या जाणाऱ्या सकारात्मक भावना त्याच्यात रुजत/दृढ होत गेल्या. तसं इस्टवूडनं सुरुवातीच्या चित्रपटात गुन्हेगार, मग इन्स्पेक्टर आणि नंतर मानसिक गुंतागुंत जाणणारा, दया, करुणा, प्रेम आणि मदतीचा हात पुढे करणारा नायक रंगवला
उत्खनन १९३९च्या मे महिन्यात उत्खनन करणारा बेसिल ब्राउन एडिथ प्रिटी या महिलेच्या ‘सफोक’ या इंग्लंडमधल्या परगण्यात खोदकाम करायला हजर होतो. पुरातत्त्वशास्त्रातलं आजतागायत अत्यंत महत्त्वाचं मानलं गेलेलं एक उत्खनन तो करतो. ‘द डिग’ या नेटफ्लिक्सवर नुकत्याच प्रदर्शित झालेल्या चित्रपटाची ही मध्यवर्ती संकल्पना. हा चित्रपट
‘पेले’ डॉक्युमेंटरी : ब्राझीलमधल्या एका कालपटाचा इतिहास ‘तो देशाचा विजय होता. तो (फुटबॉल या) खेळाचा विजय नव्हता...’ ‘पेले’ या नेटफ्लिक्सवरच्या डॉक्युमेंटरीमध्ये १३६३ गेम्समध्ये १२७९ गोल करणारा पेले स्वत: हे शेवटचं वाक्य म्हणतो. यामागचे संदर्भ ती डॉक्युमेंटरी पाहताना कळत जातात.
असा प्रीतीचा नाद अनाहत..! चित्रपटाच्या शेवटी ‘पण हे सगळं करून तू आनंदात राहशील का’ या जेरीच्या प्रश्नावर शार्लोट म्हणते, ‘आपल्या दोघांनाच जाणवणारा आपल्यातल्या प्रेमाचा तो मंतरलेला प्रदेश आपल्यात जिवंत असताना, प्रेमाचा अनाहत नाद आपल्याला ऐकू येत असताना, फक्त आपल्या नजरेला दिसणारा चांदण्यांचा झिलमिलता प्रकाश समोर असताना आपण चंद्राची

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language